Wednesday, October 10, 2012

जनता नक्कीच विसरेल !

जनता ज्याप्रमाणे बोफोर्स प्रकरण विसरली त्याप्रमाणे कोळसा कांड देखिल विसरेल हे श्री. शिंदे यांचे वक्तव्य त्यांचा आणि सरकारचा  बेजबाबदारपणा व मस्तवललापना दर्शवते . देशाच्या गृह्मंत्र्याने एखाद्या सामाजिक कार्यक्रमात असे वक्तव्य करणे ही किती लज्जास्पद बाब आहे. आर्थिक संकटाला तोंड देताना भारताच्या प्रत्येक निर्णयावर, हालचालीवर, वक्तव्यावर सम्पूर्ण जगाचे बारीक़ लक्ष्य आहे व असावेच. याची जाण गृह्मंत्रि सहेबाना असणे अपेक्षित आहे. आपल्या अशा वक्तव्याने जागतिक बाजारपेठेत गुंतवणुकदरांसमोर भारताची प्रतिमा डागाळली जाईल याचे त्यांना भान आहे का? बोफ़ोर्स प्रमाणे कोळसा कांड देखील जनता विसरेल व  यापुढे देखील आम्ही सत्तेवर आल्यावर असेच घोटाळे  करू आणि सामान्य जनता ते देखील कालांतराने विसरेल असेच त्यांना सांगायचे आहे का? असा कशाचा माज या सत्ताधार्याना  आलाय? सत्तेचा?  आम्हाला मनाला येईल ते आम्ही करू. जनतेने फक्त आम्हाला मते देऊन जे जे होईल, ते ते पहावे' ची भूमिका घ्यायची असे आपले म्हणणे असेल तर ख़बरदार! जनतेच्या विश्वसाशी व भावनांशी खेळणे थाम्बवा आता.

आता जनता विसरेल, नक्कीच विसरेल पण तुमचे घोटाळे नाहीं तर तुम्हालाच, मतदान करताना.

जय महाराष्ट्र!

No comments:

Post a Comment