Friday, October 12, 2012

डोकं ठिकान्यावर आहे का ?

खाप  पंचायत  समितीच्या म्हणण्या नुसार मुला -मुलींची लग्नाची वयोमर्यादा 18 पेक्षा कमी करून 16 वर आणावी , त्यामुळे बलात्कारांचे  प्रमाण  कमी  होईल म्हणे. आपल्या समाजातील कही घटक व त्यांची विचारसरणी  किती मागासलेली व अविवेकी आहे हे यावरून दिसते. लग्नाची   वयोमर्यादा ठरवताना विविध बाबींचा विचार होणे  आवश्यक आहे. बलात्कारांचे  प्रमाण  कमी करण्यासाठी लग्नाची वयोमर्यादा कमी करणे  हा उपाय नसून, पोलिस यंत्रणा व कायद्याची वचक गुन्हेगारांत  निर्माण करने व योग्य रितीने ती राबवने हा आहे. लग्नासाठीचे योग्य वय हे फक्त शारीरिक परिप्क्वतेवर न ठरवता त्यांची सामाजिक व मानसिक परिपक्वता देखिल गृहीत धरली पाहिजे. लग्न म्हणजे काय, समाज म्हणजे काय, नात्यांची जाण, व्यावहारिक ज्ञान, हे देखिल अतिशय महत्वाचे आहे. ज्या वयात अजुन स्वतःची पुरती ओळख झालेली नसते अशा वयात लग्न लाउन देने म्हणजे झपाट्याने बदलत चाललेल्या एक दिशाहीन समाजाच्या समुद्रात त्यांना ढकलून देण्यासारखे आहे. लहान वयात संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी व सामाजिक रुढी, रीती, परंपरा एक कुटुंब या नात्याने पेलण्याची शारीरिक व मानसिक ताकत सहाजिकच दोघांच्यात नसणार. ही जबाबदारी पेलण्यात ते कमी पडल्यास हा अल्पवयीन विवाहाचा विचार सुचवीणारा हा समाजच त्याना दोषी ठरावेल. ओमप्रकाश चौताला सारखे आपणच निवडून दिलेले मंत्री जेव्हा अशा विचारांना पाठिंबा देतात तेव्हा आपणच कुठेतरी दोषी आहोत असे वाटते. नव्या विचारसारणीचा योग्य उमेदवार निवडून देण्याची जबाबदारी आपलीच आहे ना? अशा पंचायती व मंत्री समाजाचे प्रतिनिधित्व करतात, त्यांनी सर्व गोष्टींचा सारासार विचार करावा व आपले डोके ठिकान्यावर ठेऊन निर्णय घ्यावेत अशी कळकळीची विनंती।

Wednesday, October 10, 2012

जनता नक्कीच विसरेल !

जनता ज्याप्रमाणे बोफोर्स प्रकरण विसरली त्याप्रमाणे कोळसा कांड देखिल विसरेल हे श्री. शिंदे यांचे वक्तव्य त्यांचा आणि सरकारचा  बेजबाबदारपणा व मस्तवललापना दर्शवते . देशाच्या गृह्मंत्र्याने एखाद्या सामाजिक कार्यक्रमात असे वक्तव्य करणे ही किती लज्जास्पद बाब आहे. आर्थिक संकटाला तोंड देताना भारताच्या प्रत्येक निर्णयावर, हालचालीवर, वक्तव्यावर सम्पूर्ण जगाचे बारीक़ लक्ष्य आहे व असावेच. याची जाण गृह्मंत्रि सहेबाना असणे अपेक्षित आहे. आपल्या अशा वक्तव्याने जागतिक बाजारपेठेत गुंतवणुकदरांसमोर भारताची प्रतिमा डागाळली जाईल याचे त्यांना भान आहे का? बोफ़ोर्स प्रमाणे कोळसा कांड देखील जनता विसरेल व  यापुढे देखील आम्ही सत्तेवर आल्यावर असेच घोटाळे  करू आणि सामान्य जनता ते देखील कालांतराने विसरेल असेच त्यांना सांगायचे आहे का? असा कशाचा माज या सत्ताधार्याना  आलाय? सत्तेचा?  आम्हाला मनाला येईल ते आम्ही करू. जनतेने फक्त आम्हाला मते देऊन जे जे होईल, ते ते पहावे' ची भूमिका घ्यायची असे आपले म्हणणे असेल तर ख़बरदार! जनतेच्या विश्वसाशी व भावनांशी खेळणे थाम्बवा आता.

आता जनता विसरेल, नक्कीच विसरेल पण तुमचे घोटाळे नाहीं तर तुम्हालाच, मतदान करताना.

जय महाराष्ट्र!