Wednesday, November 7, 2012

आई अंबे दार उघडू नकोस !

बऱ्याच  वाद-विवाद, आरोप-प्रति आरोपांच्या 'सोवाळयातील' द्वंदा  नंतर अखेर कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिरातील 'लाडू'  प्रसादाचा गोंधळ मिटला.

 करवीर क्षेत्र काशी हे दुर्गेच्या साडेतीन शक्तिपिठातिल एक जागृत देवस्थान, स्त्री शक्ती रूपातील आराध्य दैवत. स्वार्थासाठी स्वतःला अंबेचे 'भक्त' म्हणणारे, याच स्त्री जातीची अब्रू वेशीवर  टांगायला चाललेत. लाडूचा प्रसाद करताना स्त्रियांच्या मासिक धर्माच्या 'अडचणी'ची उघडपणे चर्चा साक्षात्  अंबेच्या, स्त्री शक्तीच्या दरबरातच होणे यापरी दूसरी विटंबना ती कोणती?

आईचे लेकरु म्हणवून घेणारे भक्तगणच जर स्वार्थासाठी आईची विटंबना करत सुटले तर तीने पहायचे तरी कोणाकडे? संकटावेळी दार उघड म्हणून धावा करणारे आम्हीच आता विनंती करतो की 'आई अंबे दार उघडू नकोस'. दार उघडल्यावर तुला पहावणार नाही असे तांडव या स्वार्थी लोकांनी तुझ्या दारात चालावलय.