Saturday, December 12, 2020

पेहराव - 'ड्रेस-कोड' सक्ती ?


सध्या महिलांसाठी 'काही' सार्वजनिक ठिकाणी पेहराव सक्ती म्हणजेच 'ड्रेस-कोड' ची चौकट लादण्याचा अट्टाहास चालू आहे. काही दिवसापूर्वी शिर्डी देवस्थानने असे नियम लागू केलेले वाचले. त्याचे अनुकरण लागलीच काही इतर देवस्थानांनी केले. आता तर काही शासकीय कार्यालयांनी देखील 'ड्रेस-कोड' ची नियमावली झळकावली आहे. अशी 'ड्रेस-कोड' सक्ती केल्यास त्याचा एवढा उहापोह का केला जातोय? यात काही राजकीय स्वार्थ तर नाही ना?. 

अशी पेहराव सक्ती बऱ्याच वर्षांपासून आपल्या सो कॉल्ड 'कॉर्पोरेट' जगतात आहेच की! जवळ जवळ सर्वच तारांकित हॉटेल्स मध्ये फक्त पेहरावच नाही तर तुमच्या पायातील वाहनांसाठी देखील काही नियम आहेत. नाईट -क्लब, पब्स, डिस्को-टेक इथे तर तुमच्या पारंपरिक पेहरावाला थाराच नाही, मग चप्पल ची गोष्ट तर लांबच. याचा गवगवा कोणी कधी केला नाही किंवा विरोध केला नाही. आपण ज्या सार्वजनिक ठिकाणी जातो, वावरतो तेथे काही अलिखित, अघोषित असे सामाजिक पेहरावाचे नियम असतात. अशा ठिकाणचे वातावरण व आपण ज्या भावनेने तेथे जातो या दोहोना जोडणारा एक प्रकारचा दुवाच असतो जणू हा पेहराव. 

काही ठिकाणची पेहराव किंवा 'ड्रेस-कोड' सक्ती आपण निव्वळ 'लाचारी', 'लोक काय म्हणतील?' किंवा आपली आर्थिक स्तिथी फुगवून दाखवण्या साठी किंवा लपवण्यासाठी मुकाट्याने पाळतोच कि! मग मंदिरांनाच विरोध का? बऱ्याच इतर धर्मीय प्रार्थना स्थळांना अशी पेहराव सक्ती शेकडो वर्षपासून चालत आली आहे. त्याबद्दल अजून एक अवाक्षर देखील नाही. व्यक्ती-स्वातंत्र्य, लोकशाही, २१ व्या शतकातील प्रगल्भ विचारांचा टेम्भा काय फक्त विशेष धर्मांनीच मिरवायचा का? 

असो, पण धार्मिक स्थळांनी किंवा शासकीय कार्यालयांनी याबद्दल 'वटहुकूम' काढण्यापेक्षा त्याबद्दल 'जन-जागृती' करावी या मताचा मी आहे. यामुळे अशाप्रकारचे नियम व कायदे करावे लागणार नाहीत. 

तसेच यासर्वांमागे मला 'राजकारणाचा' धुरकट वास देखील येतोय. सामान्य माणसाने सारासार विचार करून सामाजिक भान जपले पाहिजे असे मला वाटते. तसेच हि जबाबदारी स्त्री व पुरुष दोघांचीही बरोबरीची आहे. 

आपणांस काय वाटते ? 


Trending Fashion

Sunday, October 25, 2020

कोरोनाशी लढा - एक भयावह आणि अविस्मरणीय अनुभव (Recovering from corona the unforgettable journey of Shantanu Baraskar)

 नमस्कार!

कोरोनचा विळखा अजुनहि सैल झलेला नाही. मुंबई मध्ये कोरोना जेव्हा उच्चांकवर होता. त्यावेळी, म्हणजे जुलै च्या दुसऱ्या आठवड्यात मी 'कोरोना पॉझिटिव्ह' आलो आणि मला मोठा धक्का बसला. स्वतःला सावरण्यापेक्षा कुटुंबाला समजावणे अधिक महत्वाचे होते. ती सायरन वाजत येणारी ऍम्ब्युलन्स, ते संपूर्ण इमारतीला सील करणं, सर्व कुटुंबाची कोरोना टेस्ट हा सर्वच अनुभव अतिशय भयावह व तितकाच अविस्मरणीय आहे. 

माझ्या एम. बी. ए. च्या दिवसांपासून माझ्या संपर्कात असलेले गुरुतुल्य प्रा. राजेंद्र पारिजात यांनी पुढाकार घेऊन माझा 'कोरोना' अनुभव मुलाखत स्वरूपात रेकॉर्ड केला. माझ्या अनुभवातून इतरांना योग्य ती माहिती मिळावी व कोरोना बद्दलचा भयगंड दूर व्हावा हीच त्यांची या सर्वमागील तळमळ. 

या मुलाखतीची लिंक येथे शेअर करीत आहे Recovering from corona the unforgettable journey of shantanu baraskar (मराठी)

हि मुलाखत श्रवणीय करण्यात विवेक पोर्लेकर यांचे मोठे योगदान लाभले. 

कृपया आवर्जून ऐका!










-------------------------------------------------------------------------------------------

English Translation  

Hello!

Coron's jaw is still not loose. When Corona was at its peak in Mumbai at that time, in the second week of July, I got detected as Corona Positive and I was shocked. It was more important to convince family than to recover. The siren-sounding ambulance, the sealing of the entire building, the whole family's corona test, all of these experiences were terrifying and equally unforgettable.

A fatherly figure from my MBA days, Prof. Rajendra Parijat took the initiative and recorded my 'Corona' experience in the form of an audio interview. From my experience, he wanted to share the right information with others and to get rid of fear of Corona.

Sharing a link of this interview here 
Recovering from corona the unforgettable journey of shantanu baraskar (मराठी)

Vivek Porlekar was instrumental in making this interview audible.

Thursday, January 15, 2015

कामोठे बस-रिक्षा नांदा सौख्यभरे

कामोठे येथे बस सेवेस जन सामान्या कडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना रिक्षा संघटना मात्र त्यास विरोध करते आहे. सर्व प्रवासी बस कडे वळतील व आपल्या प्रवासी संखेत घट होऊन आपल्या मिळकतीचा स्त्रोतच घटेल असे त्यांचे म्हणणे. इतके दिवस सार्वजनिक वाहतुकीसाठी इतर पर्यायच उपलब्ध नसल्याने कामोठे वासी नाईलाजास्तव महागडा रिक्षा प्रवास सोसत होते.

पण बस सेवेस विरोध न करता आपले प्रवासी कसे वाढतील याकडे त्यांनी लक्ष देणे अपेक्षित आहे. कामोठे मुख्य रस्ता सोडल्यास इतर भागात रीक्षा थांबे नाहीत. ज्येष्ठ नागरिक, बाजारासाठी गेलेल्या गृहिणी, रुग्ण यांना अजूनही इच्छित स्थळी ये जा करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची प्रतीक्षा आहे. त्याकरिता जर रिक्षा    मीटर वर चालवल्या गेल्या तर निश्चितच सर्वांची सोय होईल. कामोठे वासियांना बस व रिक्षा दोन्हीची गरज आहे व ते दोहोंना योग्य प्रतिसाद देतील. याचा विचार करून आपल्या सेवेचा मुळ उद्देश न विसरता सेवा पुरवल्यास निश्चितच सर्वजण गुण्यागोविंदाने नांदतील व कामोठेच्या विकासात मोलाची साथ देतील.

Wednesday, April 23, 2014

आजकाल जहिरातींची पत एवढी घसरली आहे की त्या जहिरातीतील वस्तूच्या दर्जा बद्दल शंका निर्माण होते. 'झंडु' बाम सारख्या नावजलेल्या 'ब्रांड' ने सुरवातीला त्यांचे नांव वापरल्याबद्दल 'मी नव्हे त्यातला' म्हणत कायदेशीर 'दबंग'गीरी  केली व आर्थिक फायदा उचलला. नंतर पुन्हा त्याच  दबंग साठी झंडु बाम वापरायला परवानगी दिली. त्या गाण्यातील दॄश्य, बोल यांचा बामशी दूरपर्यंत संबंध नाही. आता परत हा 'झंडु' बाम रागिनी च्या सोन्याच्या 'बेबी डॉल' सोबत दरवळतोय. वस्तूच्या दर्जा बद्दल न बोलता अशा विचित्र प्रकारे जहिरातबाजी करणे म्हणजे वस्तूच्या  दर्जा बद्दल आत्मविश्वाचा आभाव  व जाहिरात विभागाने पत्करलेली हार होय. अशा जहिरातबाजीने हा बाम लोकांच्या तोंडावर येईल पण अंगावर लागणार नाहीं. जाहिरात क्षेत्राने याची कृपया दखल घ्यावी.

Sunday, July 21, 2013

पोलिसगीरी ?

पोलिसगीरी चित्रपटात संजय दत्त पोलिसांची भूमिका साकरतोय प्रत्यक्षात तो 1993 बॉम्बस्फोट प्रकरणी गुन्हेगार सिद्ध झाला असून आता शिक्षा भोगत आहे. त्याच्या गुन्ह्याचे स्वरुप पाहता व तो तुरुंगात शिक्षा भोगत असताना, पोलिसांच्या गणवेशात एक समाज 'समाज रक्षक' म्हणून चित्रपटाद्वारे समजासमोर आणला जातो हा किती विरोधाभास आहे. कोणताही चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी माहिती व प्रसारण मंत्रालयाचे 'ना हरकत' प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या संकेतस्थळा नुसार 'पोलिसगीरी' या चित्रपटास 24/06/2013 रोजी हे प्रमाणपत्र देण्यात आले. या तारखे पुर्वीच संजय दत्तचा गुन्हा सिद्ध झाला होता, त्याला शिक्षा सुनावली गेली होती व तो ती भोगण्यासाठी तुरुंगात देखील गेला. सदर प्रमाणपत्र देताना माहिती व प्रसारण मंत्रालयाने याची दखल घेतली आहे का? एका गुन्हेगारास  पोलिसवेशात समजासमोर येण्यास कशी काय परवानगी दिली जाते? याबाबतीत कडक निर्बंध, अटी व त्याची अंमलबजावणी आवश्यक आहे। याच्याशी निगडीत सर्व सरकारी संस्था व मंत्रलाये याची दखल घेतील अशी 'अपेक्षा' आहे

Friday, May 10, 2013

IPL चे कीती ?

दुष्काळग्रस्तांच्या  मदतीसाठी कही देवास्थानाच्या पुढाकरानांतर काही बड्या उद्योजकांनी मदतीसाठी पुढे केलेला हात प्रशंसनीय आहे. त्याचे अनुकरण इतर कंपन्यांनी केले तर सोन्याहून पिवळे. अशा दुष्काळ परिस्थितीत IPL मध्ये पैशाची होत असलेली प्रचंड नासाडी पहावत नाही. संघ मालकाच्यात तर  पैसे उधळण्याची जणु स्पर्धाच लागली आहे. खेळाडुंवर तर रेसच्या घोड्या सारखे पैसे लावले जात आहेत. वरुन  हे खेळाडू  ही जमवलेली माया पाठवणार आपल्या मायदेशात, त्यामुळे हा पैसा परत भारतीय अर्थ व्यवस्थेत येण्याचा प्रश्नच नाही.  IPL आयोजकांनी व खेळाडुंनी आपल्या 'नफ्यातला' एखादा  टक्का जरी दुष्काळनिधि म्हणून दिला  तरी पुरेशी मदत होईल. या IPL च्या निमित्ताने पाणी, वीज, अन्न, पैसा, इंधन यांची प्रचंड नासाड़ी चालू आहे. निदान जनाची नहीं तर मनाची म्हणून तरी त्यांनी दुष्काळनिधिस हातभार लावणे अपेक्षित आहे.

Wednesday, February 13, 2013

देवच धावले!

आजच्या दै पुढारी (मुंबई आवृत्ती) तील वृत्तानुसार महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आले असताना देवास्थानांनी मदतीचा हात पुढे केला आहे. दुष्काळ सदृष परिस्थितीतही निर्लज्ज सरकारच्या मनाला पाझर फुटत नाही हे पाहून देवालाच दया आली असावी. दुष्काळग्रस्त भागासाठी देवास्थानांनी पुढील मदत देऊ केली आहे

  • सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट, मुंबई - 25 कोटी
  • शिर्डी संस्थान, शिर्डी   - टैंकरचे पानी साठवन्यासाठी 1000 टाक्या देणार
  • दगडूशेट हलवाई ट्रस्ट, पुणे - सांगली जवळिल एक गाव दत्तक घेणार
  • शनि शिंगणापुर देवास्थान - पाण्याचे  टैंकर व जनावारंसाठी चारा छावण्या
  • तुळजापुर  आणि पंढरपुर देवस्थानाना त्यांच्या नियमावलीमुळे आर्थिक मदत करता येत नहीं, त्यामुळे सदर बदल करण्याचा  प्रस्ताव त्यानी सरकारकडे पाठवला आहे 
निव्वळ घोटळेबाजित न फसता ट्रस्ट मिळ्कतिचा असा सदुपयोग करू लागले तर  सहाजिकच समाजाच्या उन्नतीसाठी हे मोलाचे पाऊल ठरेल. आपल्या देशात अशी बरीच श्रीमंत देवस्थाने आहेत अशा नैसर्गिक किंवा आर्थिक संकटावेळी जर या देवास्थानांनी मदतीचा हात पुढे केला तर देशाची सामाजिक पातळि नक्कीच उंचावेल व भाविक देखील सढळ हताने दान करतील. देव यांना अशीच सद्बुद्धि देवो....