Thursday, January 15, 2015

कामोठे बस-रिक्षा नांदा सौख्यभरे

कामोठे येथे बस सेवेस जन सामान्या कडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना रिक्षा संघटना मात्र त्यास विरोध करते आहे. सर्व प्रवासी बस कडे वळतील व आपल्या प्रवासी संखेत घट होऊन आपल्या मिळकतीचा स्त्रोतच घटेल असे त्यांचे म्हणणे. इतके दिवस सार्वजनिक वाहतुकीसाठी इतर पर्यायच उपलब्ध नसल्याने कामोठे वासी नाईलाजास्तव महागडा रिक्षा प्रवास सोसत होते.

पण बस सेवेस विरोध न करता आपले प्रवासी कसे वाढतील याकडे त्यांनी लक्ष देणे अपेक्षित आहे. कामोठे मुख्य रस्ता सोडल्यास इतर भागात रीक्षा थांबे नाहीत. ज्येष्ठ नागरिक, बाजारासाठी गेलेल्या गृहिणी, रुग्ण यांना अजूनही इच्छित स्थळी ये जा करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची प्रतीक्षा आहे. त्याकरिता जर रिक्षा    मीटर वर चालवल्या गेल्या तर निश्चितच सर्वांची सोय होईल. कामोठे वासियांना बस व रिक्षा दोन्हीची गरज आहे व ते दोहोंना योग्य प्रतिसाद देतील. याचा विचार करून आपल्या सेवेचा मुळ उद्देश न विसरता सेवा पुरवल्यास निश्चितच सर्वजण गुण्यागोविंदाने नांदतील व कामोठेच्या विकासात मोलाची साथ देतील.

No comments:

Post a Comment