मध्य रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या तिकिट आरक्षणाची मुदत तीन महिन्यावरुन चार महीने केली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना तब्बल चार महीने अगोदर तिकीट आरक्षण करणे शक्य जाले आहे. हे जरी प्रवाशांना सोयीचे झाले असले, तरी त्याची दूसरी बाजु देखील विचारात घेणे आवश्यक आहे. चार महीने अगोदर आरक्षित केलेल्या तिकिटाची किंमत ही एक महिना किंवा एक आठवडा (उपलब्ध असल्यास ) आरक्षित केलेल्या तिकिटा इतकीच असणार आहे. तसेच सदर रक्कम ही रेल्वे चार महीने वापरणार आहे. त्याचा लाभ प्रवाशांना मिळाला पाहिजे. जितक्या अगोदर तिकिट आरक्षण केले जाईल तितक्या प्रमाणात त्या टिकिटावर सवलत, मग ती अल्प का असेना मिळाली पाहिजे. उदा.- चार महीने अगोदर आरक्षण केल्यास 5%, तीन महीने अगोदर आरक्षण केल्यास 3%, दोन महीने अगोदर आरक्षण केल्यास 2%. रेल्वे प्रशासनाने यावर विचार करावा ही अपेक्षा.
Saturday, January 5, 2013
Wednesday, November 7, 2012
आई अंबे दार उघडू नकोस !
बऱ्याच वाद-विवाद, आरोप-प्रति आरोपांच्या 'सोवाळयातील' द्वंदा नंतर अखेर कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिरातील 'लाडू' प्रसादाचा गोंधळ मिटला.
करवीर क्षेत्र काशी हे दुर्गेच्या साडेतीन शक्तिपिठातिल एक जागृत देवस्थान, स्त्री शक्ती रूपातील आराध्य दैवत. स्वार्थासाठी स्वतःला अंबेचे 'भक्त' म्हणणारे, याच स्त्री जातीची अब्रू वेशीवर टांगायला चाललेत. लाडूचा प्रसाद करताना स्त्रियांच्या मासिक धर्माच्या 'अडचणी'ची उघडपणे चर्चा साक्षात् अंबेच्या, स्त्री शक्तीच्या दरबरातच होणे यापरी दूसरी विटंबना ती कोणती?
आईचे लेकरु म्हणवून घेणारे भक्तगणच जर स्वार्थासाठी आईची विटंबना करत सुटले तर तीने पहायचे तरी कोणाकडे? संकटावेळी दार उघड म्हणून धावा करणारे आम्हीच आता विनंती करतो की 'आई अंबे दार उघडू नकोस'. दार उघडल्यावर तुला पहावणार नाही असे तांडव या स्वार्थी लोकांनी तुझ्या दारात चालावलय.
Friday, October 12, 2012
डोकं ठिकान्यावर आहे का ?
खाप पंचायत समितीच्या म्हणण्या नुसार मुला -मुलींची लग्नाची वयोमर्यादा 18 पेक्षा कमी करून 16 वर आणावी , त्यामुळे बलात्कारांचे प्रमाण कमी होईल म्हणे. आपल्या समाजातील कही घटक व त्यांची विचारसरणी किती मागासलेली व अविवेकी आहे हे यावरून दिसते. लग्नाची वयोमर्यादा ठरवताना विविध बाबींचा विचार होणे आवश्यक आहे. बलात्कारांचे प्रमाण कमी करण्यासाठी लग्नाची वयोमर्यादा कमी करणे हा उपाय नसून, पोलिस यंत्रणा व कायद्याची वचक गुन्हेगारांत निर्माण करने व योग्य रितीने ती राबवने हा आहे. लग्नासाठीचे योग्य वय हे फक्त शारीरिक परिप्क्वतेवर न ठरवता त्यांची सामाजिक व मानसिक परिपक्वता देखिल गृहीत धरली पाहिजे. लग्न म्हणजे काय, समाज म्हणजे काय, नात्यांची जाण, व्यावहारिक ज्ञान, हे देखिल अतिशय महत्वाचे आहे. ज्या वयात अजुन स्वतःची पुरती ओळख झालेली नसते अशा वयात लग्न लाउन देने म्हणजे झपाट्याने बदलत चाललेल्या एक दिशाहीन समाजाच्या समुद्रात त्यांना ढकलून देण्यासारखे आहे. लहान वयात संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी व सामाजिक रुढी, रीती, परंपरा एक कुटुंब या नात्याने पेलण्याची शारीरिक व मानसिक ताकत सहाजिकच दोघांच्यात नसणार. ही जबाबदारी पेलण्यात ते कमी पडल्यास हा अल्पवयीन विवाहाचा विचार सुचवीणारा हा समाजच त्याना दोषी ठरावेल. ओमप्रकाश चौताला सारखे आपणच निवडून दिलेले मंत्री जेव्हा अशा विचारांना पाठिंबा देतात तेव्हा आपणच कुठेतरी दोषी आहोत असे वाटते. नव्या विचारसारणीचा योग्य उमेदवार निवडून देण्याची जबाबदारी आपलीच आहे ना? अशा पंचायती व मंत्री समाजाचे प्रतिनिधित्व करतात, त्यांनी सर्व गोष्टींचा सारासार विचार करावा व आपले डोके ठिकान्यावर ठेऊन निर्णय घ्यावेत अशी कळकळीची विनंती।
Wednesday, October 10, 2012
जनता नक्कीच विसरेल !
जनता ज्याप्रमाणे बोफोर्स प्रकरण विसरली त्याप्रमाणे कोळसा कांड देखिल विसरेल हे श्री. शिंदे यांचे वक्तव्य त्यांचा आणि सरकारचा बेजबाबदारपणा व मस्तवललापना दर्शवते . देशाच्या गृह्मंत्र्याने एखाद्या सामाजिक कार्यक्रमात असे वक्तव्य करणे ही किती लज्जास्पद बाब आहे. आर्थिक संकटाला तोंड देताना भारताच्या प्रत्येक निर्णयावर, हालचालीवर, वक्तव्यावर सम्पूर्ण जगाचे बारीक़ लक्ष्य आहे व असावेच. याची जाण गृह्मंत्रि सहेबाना असणे अपेक्षित आहे. आपल्या अशा वक्तव्याने जागतिक बाजारपेठेत गुंतवणुकदरांसमोर भारताची प्रतिमा डागाळली जाईल याचे त्यांना भान आहे का? बोफ़ोर्स प्रमाणे कोळसा कांड देखील जनता विसरेल व यापुढे देखील आम्ही सत्तेवर आल्यावर असेच घोटाळे करू आणि सामान्य जनता ते देखील कालांतराने विसरेल असेच त्यांना सांगायचे आहे का? असा कशाचा माज या सत्ताधार्याना आलाय? सत्तेचा? आम्हाला मनाला येईल ते आम्ही करू. जनतेने फक्त आम्हाला मते देऊन ‘जे जे होईल, ते ते पहावे' ची भूमिका घ्यायची असे आपले म्हणणे असेल तर ख़बरदार! जनतेच्या विश्वसाशी व भावनांशी खेळणे थाम्बवा आता.
आता जनता विसरेल, नक्कीच विसरेल पण तुमचे घोटाळे नाहीं तर तुम्हालाच, मतदान करताना.
जय महाराष्ट्र!
आता जनता विसरेल, नक्कीच विसरेल पण तुमचे घोटाळे नाहीं तर तुम्हालाच, मतदान करताना.
जय महाराष्ट्र!
Subscribe to:
Posts (Atom)



